
साथ,सोबत आणि संगत…
जपान मध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करताना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते. तर ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय आडकलेला आहे. त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली, आणि त्याचं कुतूहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास पाच वर्षांपूर्वी म्हणजे हे घर नवीन बांधलं होतं तेव्हा ठोकला गेला होता. मग पाच वर्ष पाय अडकलेल्या अवस्थेत ती पाल जिवंत कशी राहिली असेल ?
असं काय घडलं होतं की त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी राहिली ? जवळ जवळ अशक्य होतं. त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच. आणि तो त्या पालीवर लक्ष ठेवुन बसला की ती आता कशी काय अन्न खाते ? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आले की, तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळ्यात अडकलेल्या पालीला अन्न भरवत आहे|||
हे पाहून तो माणूस आश्चर्यचकित झाला…. गहिवरला. कल्पना करा एक नाही, दोन नाही तर पाच वर्षे न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते. अजिबात अशा सोडून न देता, एक पालीसारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडून न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो. तेव्हा अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या. जेव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते तेव्हा तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता. कोणती गोष्ट (नातं विश्वास) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं. परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.
तुमच्या जवळच्या, अडचणीत असणाऱ्यांना तुम्ही मदत करता का…..?