लाखाच्या… कोटीच्या गप्पा [मराठी बालभारती आठवी ] Lakhachya kotichya gappa
वसंत जोशी : कथाकार, कवी, विनोदी साहित्याचे लेखक. त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्ये, बालनाट्ये आणि बालकुमार वाङ्मयाचेही लेखन केले आहे. त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह’ लोकप्रिय आहेत. बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत. थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निखळ वि नोदनिर्मिती हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत.
प्रस्तुत पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्यात लाखा…कोटींच्या गप्पा सुरू होतात; परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपणाला हसू आवरत नाही. प्रस्तुत पाठ ‘हास्यकल्लोळ-बिनबियांच्या गोष्टी’ या संग्रहातून घेतला आहे.
कथेचा आशय |
इगतपुरी स्टेशनवर इंजिनात बिघाड झाल्यामुळे गाडी तीन तास खोळंबली. लोक कंटाळले. दोन प्रवासी मात्र आनंदाने गप्पा मारीत बसले. परंतु तासाभराने तेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यावर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते मुक्तपणे आणि मोठ्याने बोलत होते. त्यांच्या बोलण्याचे सार असे : ते दोघे काका-पुतण्या होते. तरुण प्रवासी पुतण्या होता आणि म्हातारा प्रवासी काका होते. काका श्रीमंत होते. आपला पुतण्या खूप शिकावा, त्याने बॅरिस्टर व्हावे, असे त्यांना कळकळीने वाटत होते. त्यासाठी वाट्टेल तेवढा पैसा खर्च करायला ते तयार होते. विमानाचा खर्च करणार होते. इंग्लंडमध्ये राहण्यासाठी भाड्याने बंगला घेऊन दयायची त्यांची तयारी होती. दरवर्षी १५ लाख रुपये याप्रमाणे तीन वर्षांसाठी ४५ लाख रुपये ते देणार होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या बॅगेत कोट्यवधी रुपये होते. त्यांतील लागतील तेवढे पैसे ते पुतण्यासाठी खर्च करणार होते. पुतण्याची संपूर्ण युरोप पाहण्याची इच्छा पूर्ण करण्याची त्यांची तयारी होती. ऐकणाऱ्या कोणालाही काका खूपच श्रीमंत आहेत आणि ते लाखो-कोटी रुपये सोबत घेऊन हिंडतात, असे वाटले असते. तसेच झाले आणि एका भामट्याने त्यांच्या बॅगा पळवल्या. बॅगा पळवल्याची घटना उघड झाल्यावर चर्चा होते. चर्चेतून वेगळेच सत्य बाहेर येते. ते दोघे म्हणजे शरद तळवलकर आणि राजा गोसावी हे अभिनेते होते. स्टेशनवर मोठमोठ्याने चाललेल्या त्यांच्या गप्पा म्हणजे खरेतर त्यांच्या नाटकातले संवाद होते. ते तिथे बसल्या बसल्या रिहर्सल करीत होते.. त्यातून हा गमतीदार प्रसंग घडला.
पाठ समजून घेण्यासाठी येथे व्हिडीओ पहा. |
[expander_maker id=”1″ more=”Read more” less=”Read less”]
स्वाध्याय
प्रश्न २ योग्य विधान शोधा.
उत्तर ➤
(१) लेखकाची नागपूर-दादर पॅसेंजर गाडी होती.
(२) म्हातारा व तरुण करोडपती होते.
(३) तरुण वकिली करायला परदेशात जात होता.
(४) दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण !
योग्य विधान ➤ :- दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण !
(१) म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते.
(२) म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.
(३) म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते.
(४) म्हातारा व तरुण बेजबाबदार होते.
योग्य विधान ➤:-म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.
प्रश्न ३ रा : तुमच्या शब्दात उत्तर लिहा.
१) समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाआधारे लिहा.
उत्तर➤ भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका-पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्यसुद्धा वाटले. त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले. एक तर प्रवासामध्ये उचले, भुरटे चोर संधी शोधतच असतात. खरेतर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे, विशेषतः पैसा-अडका किती आहे, मौल्यवान वस्तू किती आहेत, हे मोठ्याने बोलून सांगू नये. पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना मला पटली. अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे, विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका-पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले. यातून त्या प्रवाशाचा दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो. कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा पळवल्यावरही काका-पुतणे शांत कसे, हे आश्चर्य वाटण्यासारखे होते. त्या प्रवाशालाही तसे आश्चर्य वाटले, यात नवल काहीच नाही.
२) पाठाचा शेवट वाचण्यापूरवी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा.
उत्तर➤ सुरुवाती सुरुवातीला ते दोघेजण काका-पुतण्याच आहेत, असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी, असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो-कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात. सुरुवाती सुरुवातीला ते दोघेजण काका-पुतण्याच आहेत, असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी, असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो-कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात. त्यातही विशेष म्हणजे दहा कोटी, ऐंशी लाख, चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगेमध्ये मावणे शक्यच नाही. कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वेप्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही. त्यामुळे सगळे खोटे वाटले. लोकांची केवळ गंमत करावी, म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत, असे वाटू लागले. पण शेवटी सत्याचा उलगडा होतो.
खेळूया शब्दांशी |
अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा :
(i) “राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना ?”
उत्तर ➤ प्रश्नार्थी वाक्य
(ii) “तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. “
उत्तर ➤ विधानार्थी वाक्य
(iii) “तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये.”
उत्तर ➤ आज्ञार्थी वाक्य
(iv) “म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार!”
उत्तर ➤ उद्गारार्थी वाक्य
आ) खालील तक्ता पूर्ण करा.
शब्द | मूळ शब्द | सामान्यरूप |
१) भावाला | भाऊ | भावा |
२) शाळेतून | शाळा | शाळे |
३) पुस्तकांशी | पुस्तक | पुस्तकां |
४) फुलाचा | फुल | फुला |
५) आईने | आई | आई |
इ) खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा .
१) गप्पा रंगणे.
वाक्य ➤:- दहा वर्षांनी घरी आलेल्या मामाशी रवीच्या छान गप्पा रंगल्या.
२) पंचाईत होने.
वाक्य ➤: – या वर्षी सहलीला जायचे नाही असे सरांनीच म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यांची पंचाईत झाली.
ई)खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलनी वाक्ये पुन्हा लिहा :
१) त्यांचा खेळातील दम संपत आला.
उत्तर➤ : – त्याचा खेळातील दम संपत आला.
२) कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.
उत्तर ➤: – कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला.
३) क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
उत्तर➤ : – क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
[/expander_maker]
Sanika dipak pawar
अप्रतिम
सुंदर