Home बोधकथा Katha बालपण शास्त्रज्ञांचे The childhood of scientists

Katha बालपण शास्त्रज्ञांचे The childhood of scientists

0
शास्त्रज्ञ
शास्त्रज्ञ

[ बालपण शास्त्रज्ञांचे ] Katha The childhood of scientists

                                         थॉमस अल्वा एडिसन
थॉमस अल्वा एडिसन हे अमेरिकन तंत्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म अमेरिकेतील ओहायो राज्यातील एका लहानशा गावात ११ फेब्रुवारी १८४७ रोजी झाला. त्यांनी अनेक महत्त्वाची यंत्रे बनवली. ज्यातील महत्त्वाचे विजेचा दिवा. त्याच्या  संशोधनाने सारे जग विद्युत प्रकाशाने उजळून निघाले. थॉमस हा एक अतिशय जिज्ञासू मुलगा होता. लहानपणापासूनच त्याला प्रश्न विचारण्याची सवय होती. त्याला काहीही सांगितले की तो का? असा प्रश्न करीत असे. शिक्षकांनी जर वर्गात सांगितले की पृथ्वी गोल आहे, तर बाकीची मुले शांतपणे ऐकून घेत असत. थॉमस मात्र उभा राहून का, पृथ्वी गोलच का आहे? असा प्रश्न वर्गात उपस्थित करीत असे. त्याच्या या वृत्तीमुळे त्याला शाळेत ‘मिस्टर का’ हे टोपणनाव मिळाले होते. त्याचे वर्गमित्र त्याला अनेकदा या टोपण नावाने चिडवत असत. येथपर्यंत ठीक होते. परंतु  शिक्षकांनी जेव्हा त्याच्या या सवयीची मुख्याध्यापकांकडे तक्रार केली तेव्हा मात्र समस्या निर्माण झाली. शिक्षकांच्या सल्ल्यावरून मुख्याध्यापकांनी थॉमसला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र त्यांनी एके दिवशी थॉमसच्या हातात दिले आणि त्याच्या आईला दाखवायला संगितले.
थॉमसची आई मुख्याध्यापकांनी दिलेले ते पत्र वाचू लागली तसे तिचे डोळे पाणावले. आपल्या मुलाला शाळेतून काढून टाकले, हे कळल्यावर आईला दु:ख होणे साहजिक होते. पण तिने स्वतःला लगेच सावरले. तोपर्यंत थॉमसचे कुतूहल जागे झालेच होते. त्याने आईला विचारले काय लिहिलं आहे गं या पत्रात? आईने सांगितले अरे तुझ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी असे लिहिले आहे तुमचा मुलगा अतिशय हुशार आहे… अशा हुशार मुलाला शिकवण्यासाठी आमची शाळा समर्थ नाही. एकतर त्याच्यासाठी दुसरी शाळा बघा किंवा तुम्हीच त्याला शिकवा. आता उद्यापासून शाळेत जायला मिळणार नाही याचे थॉमसला दु:ख झाले. परंतु उद्यापासून तुला शाळेत जायची गरज नाही. मीच तुला घरी शिकवणार आहे. असे जेव्हा त्याची आई म्हणाली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे नैराश्य कुठल्याकुठे पळून गेले. ठरल्याप्रमाणे त्याच्या आईने त्याला लिहायला आणि वाचायला शिकवले. थॉमसमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली. त्यातून मिळेल ते पुस्तक तो अधाशासारखा वाचून काढत असे. या वाचनाचा त्याचे स्वतःचे कुतूहल शमण्यासाठी त्याला खूप उपयोग झाला. कालांतराने त्याची आई स्वर्गवासी झाली. तिच्या मृत्यूनंतर तिचे सामान पद्धतशीर ठेवण्यासाठी म्हणून थॉमसने आईची एक जुनी ट्रंक उघडली. त्या ट्रंकेत त्याला एक कागद सापडला. त्याच्या लहानपणी शाळेतून काढून टाकताना मुख्याध्यापकानी जे पत्र दिलं तेच ते पत्र होतं. कुतूहल म्हणून त्याने ते पत्र वाचलं. त्यात लिहिलं होतं तुमचा मुलगा ढ आहे. शाळेतील शिक्षण पूर्ण करण्याची त्याची क्षमता नाही. त्याला आम्ही आमच्या शाळेतून काढून टाकत आहोत. उद्यापासून त्याला शाळेत पाठवू नये. हा मजकूर वाचून थॉमसच्या डोळ्यांत पाणी आले आणि आईच्या मोठेपणाची त्याला परत एकदा जाणीव झाली.

 निरीक्षण आणि कुतूहल असे दोन महत्त्वाचे गुण घेऊन थॉमस जन्माला आला होता. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे तो बारकाईने निरीक्षण करीत असे आणि त्यावर विचार करीत असे. त्याने पाहिले की पक्षी आकाशात उडतात, आपल्याला मात्र उडता येत नाही. असे का? प्रश्न साधाच आहे. त्याचे उत्तर कोणीही जाणकार माणूस सहज देऊ शकेल. परंतु कोणाला विचारत बसण्याऐवजी त्याने स्वतःच उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बालमनाला असे वाटले की पक्षी किडे खातात म्हणून ते आकाशात उडू शकतात. आपण जर किडे खाल्ले तर आपणसुद्धा आकाशात उडू शकू. आपला अंदाज बरोबर आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी त्याने शेजारच्या एका मुलीला किडे खाण्याची विनंती केली. तिने त्या विनंतीला साफ नकार दिला. म्हणून त्याने किड्यांना ठेचून त्याचे सरबत बनवले आणि ते तिला प्यायला दिले. ते सरबत प्यायल्यावर मुलगी उडेल म्हणून तो आकाशाकडे पाहू लागला. प्रत्यक्षात मात्र ती मुलगी जमिनीवर पडली आणि उलट्या करू करू लागली.

थॉमसच्या घरात एक कोंबडी होती. ती साधारणपणे १५-२० अंडी दिली की अंडी देणे थांबवत असे. त्यानंतर त्याची आई सगळी अंडी एकत्र करून एका टोपलीत ठेवायची. या अंड्यांवर ती कोंबडी २१ दिवस बसायची. त्यानंतर त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायची, अंडे उबवण्याची ही प्रक्रिया थॉमसने अनेकदा पाहिली. त्याला वाटले की कोंबडीचे वजन कमी असल्यामुळे अंड्यातून पिल्ले चाहेर पडायला वेळ लागत असावा. कोंबडीच्या ऐवजी आपण जर अंड्यावर बसलो तर पिल्ले लगेच बाहेर येतील. एकदा अंदाज बांधल्यावर त्याची पडताळणी करणे हा त्याचा स्वभावच होता. घरच्या कोंबडीने घातलेली पाच सहा अंडी त्याने घेतली आणि त्यावर बसला. अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याऐवजी लगदा बाहेर आला. 

Katha बालपण शास्त्रज्ञांचे

Previous articleनव्या युगाचे गाणे( कविता ) मराठी बालभारती इयत्ता आठवी Navya yugache gane marathi balbharti aathvi
Next article[सकारात्मक विचार – गाडीवान ते मार्गदर्शक] Positive Thinking – Driver to Guide
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here