‘कर्ते सुधारक कर्वे’ या पाठात डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे व्यक्तित्व आणि कार्यकर्तृत्व यांचा परिचय करून दिला आहे. भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, समाजाच्या छळवादी वृत्तीकडे क्षमाशीलपणे दुर्लक्ष करून अंगी बाणवलेली अविचल ध्येयनिष्ठा, ‘बोले तैसा चाले’ अशी तत्त्वनिष्ठ वृत्ती ही महर्षी कर्वे यांची गुणवैशिष्ट्ये लेखकाने या उलगडून दाखवली आहेत. Karte Sudharak Karve Iyaata Dahavi kumaarbharti
ईश्वरचंद्र विदयासागर: ईश्वरचंद्र विदयासागर हे स्वातंत्र्यपूर्वकाळातील बंगाली विद्वान, लेखक आणि उदारमतवादी समाजसुधारक होते. विधवा विवाह चळवळीला त्यांचा पाठिंबा होता. ‘पराशर संहिता’ या हिंदू धर्मातील आचरणाची तत्त्वे सांगणाऱ्या ग्रंथामध्ये विधवा विवाहाला मान्यता असल्याचा दाखला त्यांनी दिला.
पंडिता रमाबाई :
स्वातंत्र्यपूर्वकाळातील सामाजिक कार्यकर्त्या आणि विदुषी. त्यांनी विधवांच्या कल्याणासाठी ‘शारदा सदन’ ही संस्था सुरू केली. अनाथ स्त्रिया आणि मुलांसाठी ‘मुक्तिसदन’ या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘कैसर-ए-हिंद’ हा पुरस्कार प्रदान केला होता.