Home न्यूज मोफत ऑनलाईन अंतराळ विज्ञान कोर्स : इस्रो

मोफत ऑनलाईन अंतराळ विज्ञान कोर्स : इस्रो

0
.

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही एक नामांकित वैज्ञानिक संघटना आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील क्षमतेला अधिक मजबूत करण्यात तसेच अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि त्याच्या विकासात इस्रो (ISRO) चे मोठे योगदान असते. ISRO ने भारतीय आणि परदेशातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या समृद्धीसाठी विनामूल्य ऑनलाइन कोर्स जाहीर केला आहे व “Overview of Space Science and Technology” या मोफत ऑनलाईन कोर्ससाठी अर्ज मागवले आहेत.
उद्देश: शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी जागरुकता निर्माण करणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे.
कोर्सची वैशिष्ठे:
  • हा कोर्स 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठीच आहे.
  • सहभागींना भारतातील नामवंत अवकाश शास्त्रज्ञांद्वारे देण्यात येणार्‍या तांत्रिक सत्रात सहभागी होता येईल.
  • 6 जून ते 5 जुलै 2022 या कालावधीत हा कोर्स चालेल.
  • नोंदणी 30 जून 2022 पर्यंतच करता येईल.
  • कोर्सदरम्यान एकूण 10 तासांचे ऑनलाइन व्हिडिओ सत्र आयोजित केले जातील.
  • सदर ऑनलाइन व्हिडिओ सत्र विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार पाहता येतील.
  • विद्यार्थी अनेक वेळा व्हिडिओ पाहू शकतात.
  • व्हिडिओ पाहण्याच्या नोंदींवर आधारित त्या सत्रातील उपस्थिती सिस्टमद्वारे चिन्हांकित केली जाईल.
  • सहभागींना IIRS-ISRO कडून प्रमाणपत्र देखील दिले जाईल.
कोर्समधील अभ्यासविषय/घटक:
  • अंतराळ तंत्रज्ञान आणि भारतीय अंतराळ कार्यक्रम
  • अंतराळयान प्रणाली
  • सॅटेलाइट कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन तंत्रज्ञान
  • खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान
  • उपग्रह हवामानशास्त्र आणि त्याचे अनुप्रयोग
  • ग्रहांचे भूविज्ञान
  • उपग्रह आधारित पृथ्वी निरीक्षणे आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान
  • रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन्स
  • शहरी वारसा अभ्यासासाठी क्लोज रेंज फोटोग्रामेट्री
  • ऑनलाइन शिक्षण संसाधने आणि भौगोलिक तंत्रज्ञानामध्ये करिअरच्या संधी

    प्रयोग:

  • माहिती काढण्यासाठी उपग्रह प्रतिमा वाचणे
  • ऑनलाईन डेटा रिपॉझिटरीजमधून जिओडेटा प्रवेश आणि GIS वापरून समस्या सोडवणे
नोंदणी व नोंदणीनंतरची प्रक्रिया:
  • इच्छुकांनी https://isat.iirs.gov.in/mooc.php अधिकृत वेबसाइटवर आवश्यक नोंदणी तपशील प्रविष्ट करावेत.
  • यशस्वी नोंदणी केल्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना ई-क्लास लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम (LMS) साठी त्यांचे लॉगिन क्रेडेंशियल्स (E-class URL, User name आणि Password) ईमेलद्वारे प्राप्त होतील.
  • त्यानंतर IIRS E-क्लास URL लिंकवर क्लिक करा. तिथे तुमचे User name, Password व Capatcha प्रविष्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा Dashboard प्राप्त होईल. तिथे My course वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या “Overview of Space Science and Technology-for school students” हया कोर्सवर क्लिक करा. तुमच्या कोर्सशी संबंधित Video, PDF इ. मटेरीअल तुम्हाला प्राप्त होईल. वेळोवेळी त्याचा आभास करा.
  • Dashboard वर दिलेल्या सूचना व्यवस्थित पाहून कोर्स सुरु करा. तसेच Dashboard मधील इतर Menu देखील पहा.
  • तुमच्या Dashboard ला वेळोवेळी भेट देत रहा व नवनवीन updates तपासत रहा.
  • ई-क्लास LMS वरून विद्यार्थी त्यांच्या भविष्यातील संदर्भांसाठी अभ्यास साहित्याची PDF आवृत्ती देखील डाउनलोड करू शकतात.
  • व्हिडिओ सत्र पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा मूल्यमापनात भाग घेणे आवश्यक आहे.
  • सर्व तांत्रिक सत्रे आणि शिक्षण संसाधने प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत खात्याअंतर्गत 5 जुलै 2022 पर्यंत उपलब्ध असतील.
  • विद्यार्थी त्यांच्या शंका चर्चा-मंचावर देखील पोस्ट करू शकतात.
  • कोर्स संदर्भात काही समस्या असल्यास [email protected] या ईमेल वर संपर्क करावा.

 

कोर्स संदर्भातील महत्वाच्या लिंक्स:
ऑनलाईन नोंदणी कोर्स ब्रोशर
IIRS ई-क्लास लर्निंग पोर्टल कोर्स मार्गदर्शिका (हिंदी)
कोर्स मार्गदर्शिका (इंग्रजी)

 

कोर्स प्रमाणपत्र
तांत्रिक सत्रातील विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि ऑनलाईन प्रश्नमंजुषा मूल्यमापनातील गुणांवर आधारित सहभागींना IIRS-ISRO कडून प्रमाणपत्र दिले जाईल. अभ्यासक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रश्नमंजुषामध्ये किमान 60% गुण आणि व्हिडिओ सत्रात 70% उपस्थिती आवश्यक आहे. ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी अधिक माहितीसाठी कोर्स ब्रोशर पहावे.
Previous articleशाळांचे सन २०२२-२३ शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत सूचना Educational Update
Next articleआजी : कुटुंबाचं आगळ | पाठाचे स्पष्टीकरण- स्वाध्याय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here