राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सन २०२२-२३ शैक्षणिक वर्ष सुरु करणेबाबत
शासन निर्णय क्र. संकिर्ण-२०२२/प्र.क्र.५८ / एसडी ४, दि. ११.०४.२०२२ निर्णयानुसार संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरु करण्याबाबत निर्देश निर्गमित केलेले आहेत. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२0२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून २०२२ रोजी शाळा सुरु करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून २०२२ रोजी सुरु होतील.
याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
१) दि. १३ जून २०२२ ते १४ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-१९ प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. दि. १५ जून २०२२ पासुन विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात तसेच विदर्भातील शाळांबाबत दि.२४ जून २०२२ ते २५ जून २०२२ रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांचे कविड- १९ प्रार्दुभाव तसेच आरोग्यविषयक बाबीचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे दि. २७ जून २०२२ पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत येण्याच्या सूचना निर्गमित करण्यात याव्यात.
(२) शासनाकडून आरोग्य विभागाकडून स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी निर्देश/सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच यापुढे करण्यात आल्यास त्यांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
(३) शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचे / पालकांचे कोविड- १९ प्रादुभावाच्या अनुषंगाने प्रबोधन उद्बोधन करण्यात यावे.
संदर्भ: मा.आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे. यांचे पत्र
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️