विद्यार्थी मित्रांनो, जलसुरक्षा या विषयाचे अध्ययन करताना तुम्हांला तुमच्या आजूबाजूची परिस्थिती, संबंधित घटक यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे लागेल. या विषयातील विविध संकल्पना, संबोध, तत्त्वे, सिद्धान्त समजून घ्या व त्यांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घाला. जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या प्रमुख घटकांचा समावेश या विषयामध्ये करण्यात आला आहे. जलसुरक्षा विषयाची मांडणी करताना पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका अशी करण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक हे विषयाच्या संपूर्ण माहितीचे असणार आहे तर कार्यपुस्तिका ही तुम्ही करावयाच्या सर्व कृती व उपक्रम यांची म्हणजे उपयोजनाची आहे. तुम्ही अभ्यासलेल्या आणि प्रत्यक्ष केलेल्या कार्याचे एक उत्तम असे शैक्षणिक साहित्य तयार होणार आहे. यामुळे तुमच्यामध्ये संशोधक वृत्ती विकसित होण्यास निश्चितच मदत होईल. वनस्पती, प्राणी यांना इजा होणार नाही याची काळजी घ्या. ही कार्यपुस्तिका पूर्ण करताना आणि समजून घेताना तुम्हांला त्यातील आवडलेला भाग तसेच अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी, पडणारे प्रश्न आम्हांला जरूर कळवा.. |
जलसुरक्षा हा विषय इयत्ता दहावीसाठी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून निर्धारीत करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक व कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर कार्यपुस्तिकेमध्ये चार प्रमुख घटकांवर आधारित विद्यार्थ्यांनी करावयाच्या सर्व कृती, उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे. त्याविषयी सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे.
|
जलसुरक्षा विषयाची मूल्यमापन योजना येथे पहा. |
जलसुरक्षा विषय मूल्यमापन योजना
जलसुरक्षा कार्यपुस्तिका- उपक्रम व प्रकल्पासंदर्भात महत्वाच्या सूचना.. 1. जलसुरक्षा या पाठ्यपुस्तकातील आशयावर आधारित घटकनिहाय विविध उपक्रम व प्रकल्प दिले आहेत. हे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करावयाचे आहेत.
2. प्रत्येक उपक्रमाची व प्रकल्पाची कार्यवाही करण्यापूर्वी देण्यात आलेली माहिती व प्रकरणाचे वाचन करा.
3. उपक्रमाचा व प्रकल्पाचा उद्देश व महत्त्व थोडक्यात लिहा. उपक्रम व प्रकल्पास लागणारा कालावधी, साहित्य, साधने इत्यादींची नोंद व्यवस्थित करा.
4. उपक्रमासंदर्भात फोटो, चित्रे दिलेल्या जागी चिटकवावीत तसेच आवश्यक तेथे आकृत्या काढाव्यात. आवश्यक असल्यास नकाशांचा वापर करावा. 5. माहिती संकलनासाठी आवश्यक असल्यास प्रश्नावली / मुलाखती यांचा वापर करावा. उपक्रमातून/प्रकल्पातून प्राप्त झालेल्या माहितीचे संकलन करावे.
6. आवश्यक तेथे तक्ते, आलेख, आकृत्या काढाव्यात. अनुमान स्पष्ट लिहावे. प्रकल्पासंदर्भात फोटो, छायाचित्रे चिटकवावीत.
7. माहितीच्या संश्लेषणातून आणि विश्लेषणातून उपक्रमाबद्दल / प्रकल्पाबद्दल निष्कर्ष लिहावेत. 8. उपक्रमाच्या /प्रकल्पाच्या माध्यमातून कोणकोणत्या संकल्पना स्पष्ट झाल्या ते नमूद करावे.
9. पालकांच्या सहभागाविषयी माहिती नोंदवावी तसेच त्यांचे मत घ्यावे व ते पालकांनी स्वतः कार्यपुस्तिकेत नोंदवावे.
10. उपक्रमासाठी / प्रकल्पासाठी वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची नोंद करावी.
11. पालकांच्या व विविध घटकांच्या सहभागाविषयी माहिती नोंदवावी, तसेच त्यांचे मत घ्यावे. ऋणनिर्देशात त्यांची नोंद करावी.
12. उपक्रम / प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यावर मूल्यमापन स्वरूपात शिक्षकांचा अभिप्राय स्वाक्षरीसह घ्यावा |
इयत्ता 10 वी जलसुरक्षा नमुना कार्यपुस्तिका pdf येथे पहा. |
इयत्ता 10 वी जलसुरक्षा नमुना कार्यपुस्तिका
i have jalsuraksh jivandip vahi in marathi
Nice Website🥰👍