राज्यातील शिक्षकांना रोज काढावे लागणारे दैनिक पाठटाचण आता बंद करण्यात आले आहे. याबाबत विद्या प्राधिकरणाने दि. 15 सप्टेंबर 2019 रोजी तसे आदेश काढले आहेत परंतु…
शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने शिकत असतो व त्यापद्धतीने शिक्षकांना अध्यापन करावे लागत असून त्यासाठी पारंपरिक पद्धतीने काढावे लागणारे दैनिक, मासिक व वार्षिक नियोजनाचे टाचण निरर्थक ठरत आहे. शालेय शिक्षण विभागाने त्या संदर्भात दि. 22 जून 2015 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा शासन निर्णय निर्गमित केला त्यामध्ये अशा प्रकारच्या पाठटाचणा सारख्या कागदपत्रांची शिक्षकांकडून मागणी करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तरीदेखील आपल्या राज्यातील अनेक शाळा व अधिकाऱ्यांकडून पाठ टाचण वहीची सक्ती करण्यात येत होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयाच्या १३.१ मुद्द्यांचा आधार घेत वस्तुस्थिती समजावून. अव्वर सचिवांनीही तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत आदेश काढून राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देत पाठ टाचणची सक्ती न करण्याचे आदेश काढले. शिक्षकांचे पाठटाचण काढण्याची सक्ती नाही. shikshakana-paath-taachan-sakti-n-karane-paripatrak
शिक्षकांना पाठटाचण काढण्यासाठी सक्ती न करणेबाबत सर्व परिपत्रके-
प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी इंग्रजी विषयाचे अतिशय उच्च दर्जाचे अभ्यास साहित्याच्या लिंक एकत्र केल्या आहे. यात 10 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमातील इंग्रजी...