भरतवाक्य कविता स्वाध्याय – Bharatvaky kavita Balbharati Solutions for Marathi
मोरोपंत रामचंद्र पराडकर (१७२९ ते १७९४) सुप्रसिद्ध पंडित कवी. काव्य, नाटक, व्याकरण, अलंकार, न्याय, वेदात इत्यादी विषयांचा अभ्यास. वयाच्या २२ ३ व्या वर्षापासून काव्यलेखनास प्रारंभ. संस्कृतप्रचुर काव्यरचना, आलंकारिक साजशृंगार ल्यायलेली भाषा, वृत्तांचा यथायोग्य वापर हे पंडिती कवितेचे विशेष त्यांच्या काव्यात सापडतात. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी विपुल काव्यरचना केली. सुमारे २६८ काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत.
पंडिती कवितेसह त्यांच्या लेखणीने संस्कृत काव्यरचनाप्रकारांत संचार केला आहे. त्यांचे समग्र वाङ्मय ‘कवीवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ: खंड १ ते १२ यांत संग्रहित करण्यात आले आहे. कवीचे साहित्यलेखन : आर्याभारत, केकावली, मंत्रभागवत, मंत्ररामायण, श्रीकृष्णविजय, हरिवंश. कवितेचा आशय : प्रस्तुत केका मोरोपंतांच्या ‘केकावली’तून घेतल्या आहेत. ‘केका’ म्हणजे मोराचा टाहो आणि आवली म्हणजे पंक्ती. मोरोपंतांनी स्वतः स ‘मोर’ कल्पून, ईश्वराला मारलेल्या हाकांना, ईश्वराच्या केलेल्या आळवणीला ‘केकावली’ असे म्हटले गेले आहे. प्रस्तुत केकांमधून कवी मोरोपंत सद्गृहस्थ किंवा सज्जन माणसांच्या संगतीचे व त्यांच्या विचारांच्या सान्निध्याचे महत्त्व सांगत आहेत. कोणत्याही लोभा-मोहाला बळी पडू नये, वृथा अभिमान सोडून भक्तिमार्ग आपलासा करावा, आणि भगवद्भक्तीत मन रमवावे, असा आशय या केकावलीतून व्यक्त होतो.
Balbharati Solutions for Marathi – Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board [मराठी – कुमारभारती इयत्ता १० वी] |
कवितेचा भावार्थ
कवी मोरोपंत प्रस्तुत केकावलीत म्हणतात,
सुसंगति सदा घडो………………… मन भवच्चरित्रीं जडो ।।
‘सज्जनांची संगत सतत घडावी; सतत चांगल्या लोकांची वचने, बोल कानावर यावेत; बुद्धीवरील गंज, वाईट विचार, दोष निघून जावेत; ऐहिक सुखोपभोगांचा नेहमीच वीट यावा,’साधुसंतांच्या कोमल पदकमलांच्या ठायी आसरा मिळावा; त्यांनी दूर ढकलले तरी मनाने हट्टाने तेथेच अडून राहावे, (इतके करूनही) त्या सत्चरणांपासून विरह सहन करावा लागलाच तर मनाने खूप रडावे; (पण) नेहमी त्याने सत्पुरुषांच्या चरित्रांतच रमावे.
न निश्चय कधीं ढळो………………आत्मबोधें जळो ।।
मनाने कधीही डगमगू नये, निश्चय भंग पावू देऊ नये, दुष्ट लोकांनी निर्माण केलेल्या विघ्नांची बाधा दूर व्हावी, चित्त भजनापासून ढळू नये; सज्जनांनी सांगितलेल्या मार्गाकडे, भक्तिमार्गाकडे बुद्धी वळावी, हृदयाला आत्मतत्त्वाचे भान यावे, खोटा अभिमान (दंभ) साफ नाहीसा होवो, असे पावन झालेले, भक्तिमार्गाला लागलेले मन पुन्हा विषयांच्या लालसेने मलीन होऊ नये आणि आत्मज्ञानाने सारे पाप जळून भस्मसात व्हावे.
मुखीं हरि ……………………… सदा सांवरी ।।
हे हरि (प्रभो), माझ्या मुखात तुझ्या नामावलीचा सदा वास होवो. तिच्यामुळे माझ्या संपूर्ण कामना सफल होतील. या दासावर हे (तिन्ही लोकांत वास करणाऱ्या) जगन्नाथा, तू कृपा कर. तुझ्या आश्रयाला येणाऱ्या लोकांवरही तुझी तशीच कृपादृष्टी बरसू दे.
कवितेचा भावार्थ समजावून घेण्यासाठी येथे व्हिडीओ पहा
Not open
And what app group add
Plisc