Home कविता baalbharti aathvnitil kavita raajhans

[बालभारतीआठवणीतील कविता-राजहंस ] baalbharti aathvnitil kavita raajhans

0
बालभारती ( कविता )
बालभारती ( कविता )

[बालभारतीआठवणीतील कविता-राजहंस ] balbharti aathvnitil kavita raajhans

  राजहंस

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख

होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक
पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणासी?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक
एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना, चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक
                             – ग. दि.माडगूळकर
Previous articleमहागाई भत्ता DA
Next article[मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ] Vakprachar list with Meaning in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here