Home १० वी बालभारती Apaache Patra Swadhyay Iyatta Dahavi | आप्पांचे पत्र स्वाध्याय इयत्ता दहावी

Apaache Patra Swadhyay Iyatta Dahavi | आप्पांचे पत्र स्वाध्याय इयत्ता दहावी

0
आप्पांचे पत्र
  • Apache Patra Swadhyay Iyatta Dahavi | आप्पांचे पत्र स्वाध्याय इयत्ता दहावी
अरविंद जगताप (जन्म: १९७७)
सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथालेखक. कला, साहित्य, चित्रपट व दूरदर्शन या क्षेत्रांत त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी विविध सामाजिक व संवेदनशील विषयांवर लेखन केले आहे. त्यांची हृदयाला भिडणारी लेखनशैली प्रसिद्ध आहे. ‘चला हवा येऊ दया’ या लोकप्रिय मालिकेतील त्यांची ‘पोस्टमन काकांची पत्रे’ महाराष्ट्राच्या घराघरांतून पोहोचली आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा २०१२ चा पुरस्कार’, व्ही. शांताराम पुरस्कार’, ‘सहयाद्री सन्मान पुरस्कार प्राप्त आहेत.
लेखकाचे लेखनसाहित्य:
मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांसाठी लेखन. विविध वृत्तपत्रे व नियतकालिके यांतून लेखन.
‘पत्रास कारण की’ हे पुस्तक प्रकाशित.
पाठाची पार्श्वभूमी
अरविंद जगताप लिखित ‘आप्पांचे पत्र’ हा पाठ म्हणजे शाळेतल्या शिपाई काकांनी पत्राच्या माध्यमातून विदयार्थ्यांशी केलेले मनमोकळे हितगुज आहे. प्रस्तुत पत्रातून शिपाई काका विदयार्थ्यांना कोणतेही काम हे कमी दर्जाचे नसते हे सांगून प्रामाणिकपणे कष्ट केल्यास हमखास यश मिळते असा संदेश देतात.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ. भारताच्या ‘भारतरत्न’ या सर्वोच्च किताबाचे मानकरी. देशाच्या वैज्ञानिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या ‘अग्नी’ या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे जगभरातून त्यांचा गौरव झाला. विज्ञानाचे निस्सीम चाहते असलेले डॉ. कलाम मनाने अतिशय साधे व संवेदनशील होते.
बिस्मिल्लाह खान उस्ताद बिस्मिल्लाह खान हे ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित जगप्रसिद्ध भारतीय सनईवादक होते. शुभप्रसंगी वाजवल्या जाणाऱ्या सनई या वादयास आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देण्याचे कार्य उस्ताद बिस्मिल्लाह खान यांनी केले.
वेरूळ-अजिंठा लेणी औरंगाबाद शहरापासून जवळच ही जगप्रसिद्ध लेणी वसलेली आहेत. भारत सरकारने वेरूळची लेणी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केली आहेत.स्थापत्त्य व शिल्पकलेचा सुरेख संगम या लेण्यातील शिल्पांतून पाहावयास मिळतो.
अजिंठा लेणी ही बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली महत्त्वपूर्ण लेणी आहेत.गौतम बुद्ध यांच्या विविध भावमुद्रा, तसेच बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान चित्रशिल्पांत व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा आविष्कार अजिंठा लेण्यांतून पाहावयास मिळतो. ही लेणी देशी, तसेच विदेशी पर्यटकांच्या पसंतीची पर्यटन स्थळे आहेत.
सवाई  गंधर्व महोत्सव सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा शास्त्रीय संगीतातला सर्वांत मोठा महोत्सव म्हणून गणला जातो. ‘भारतरत्न’ पंडित भीमसेन जोशी यांनी स्थापन केलेल्या ‘आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो.
पूर्वी ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाचे पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे नामकरण करण्यात आले.
सुदर्शन पटनायक ओरिसातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वाळू शिल्पकार आहेत. काही घरगुती कारणांनी शिक्षण पूर्ण करू न शकलेल्या सुदर्शन यांनी वयाच्या सातव्या वर्षांपासूनच पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वाळूच्या कणांतून विविध शिल्पं साकारली.
२००८ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट ‘वाळुशिल्पकार’ हा किताब त्यांनी पदार्पणातच पटकावला. त्यांचे ओरिया, बंगाली, हिंदी, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आहे.
पाठातील मह्त्वाचे मुद्दे

चिंता
सध्या पालक मुलांच्या भवितव्याबाबत जास्त चिंता करताना दिसतात.

पदापेक्षा काम महत्त्वाचे
फक्त उच्च पदावरील व्यक्ती महत्त्वाची असते आणि तिचेच काम महत्त्वाचे असते, असे मानणे चुकीचे आहे. कोणीही स्वतःचे काम किती निष्ठेने करतो, किती चांगले करतो हे महत्त्वाचे असते. म्हणून शाळेतील शिपाईकाका असोत किंवा क्रिकेटची खेळपट्टी सांभाळणारा कर्मचारी असो, या व्यक्तीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात.

ठरावीक उच्च पद म्हणजेच सर्वश्रेष्ठ जीवन नव्हे.
ठरावीक उच्च पदाचाच सगळ्यांनी ध्यास बाळगणे योग्य नाही. ते उच्च पद मिळाले नाही म्हणून नाइलाजाने काहीतरी स्वीकारले जाते. याने जीवनातला आनंद मिळू शकत नाही.

इतरांपेक्षा वेगळे कामसुद्धा महत्त्वाचे असते.
एखादी व्यक्ती अगदी वेगळेच कार्य आयुष्याचे ध्येय म्हणून स्वीकारते आणि त्यातून महान सामाजिक कार्य पार पडते. त्या व्यक्तीने स्वीकारलेले कार्य काही वेळा सर्वसामान्यांना बिनमहत्त्वाचे वाटू शकते. पण ते बिनमहत्त्वाचे वाटणारे काम निष्ठेने पार पाडल्यामुळे त्यातून मोठे सामाजिक कार्य घडून येते.

निसर्गाशी मैत्री आवश्यक
आपण निसर्गाकडे लक्ष देत नाही. त्याच्याविषयी आपल्या मनात जिव्हाळा नसतो. म्हणून अनेकदा कोणालाही दहा झाडांची किंवा पक्ष्यांची नावे सांगता येत नाहीत. प्रत्यक्ष निसर्गाशी मैत्री केल्याशिवाय हे घडणे शक्य नाही. गाडीपेक्षा झाडी महत्त्वाची आहे. निव्वळ भौतिक प्रगती माणसाला जगण्यासाठी पुरेशी नाही.

खूप पैशापेक्षा उत्कृष्टता महत्त्वाची
परदेशातला निसर्ग पाहण्यापेक्षा स्वतःच्या देशातला निसर्ग समृद्ध केला पाहिजे. खूप पैसे मिळवून देणारा व्यवसाय करणारे खूप असतात. पण उत्कृष्ट गवई होणे, उत्कृष्ट लेखक होणे किंवा उत्कृष्ट शेतकरी होणे हेसुद्धा खूप महत्त्वाचे असे व्यवसाय आहेत. काहीतरी भव्यदिव्य करता आले पाहिजे.

उत्तम रितीने जगा
मुलांनी मनसोक्त जगले पाहिजे. उत्तम रितीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगाने वाखाणणी केली पाहिजे. कालांतराने लोक तुमचे काम बघतात. तुम्ही परीक्षेत किती गुण मिळवले हे बघत नाही.स्वाध्याय सोडवण्यासाठी
येथे क्लिक करा.

मराठी कुमारभारती इयत्ता दहावी सराव कृतिपत्रिका व मागील वर्षातील 
झालेल्या मार्च/सप्टेंबर/नोव्हेंबर बोर्ड परीक्षेतील मराठी विषयाच्या कृतिपत्रिका 
या ठिकाणी दिलेल्या आहे. 

सराव कृतिपत्रिका व बोर्ड कृतिपत्रिका मिळविण्यासाठी  क्लिक करा

👉  सराव कृतिपत्रिका ( इयत्ता दहावी ) 
👉  मागील वर्षातील बोर्ड कृतिपत्रिका ( इयत्ता दहावी ) 

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank

प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी इयत्तेवर क्लिक करा

👉 इयत्ता- पाचवी (इयत्ता ५ वी )
👉  इयत्ता- आठवी (इयत्ता ८ वी)

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे प्राथमिक / माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०१७ व फेब्रुवारी २०२१ या वर्षातील सरावासाठी जुन्या प्रश्नपत्रिका व उत्तरसुची डाउनलोड करण्यासाठी खाली निळ्या रंगाच्या सूचनेवर क्लिक करा. 👉👉
👉👉प्राथमिक/माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०१७ या वर्षातील जुन्या प्रश्नपत्रिकांसाठी 
क्लिक करा.
Previous articleNMMS- National Means cum Merit Scholarship Scheme Exam | राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा
Next articleगोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी | Goshta Arunimachi class 10th.
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here