Home १० वी बालभारती दहावी मराठी कुमारभारती तोंडी परीक्षा | अंतर्गत मूल्यमापन | नमुना प्रश्नपत्रिका 10th...

दहावी मराठी कुमारभारती तोंडी परीक्षा | अंतर्गत मूल्यमापन | नमुना प्रश्नपत्रिका 10th Marathi Kumarabharati Oral Examination | Internal Evaluation | Sample question paper

3
 10 वी मराठी तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका, 10-vi-tondi-pariksha-10-th-oral-exam-sample-questionpaper, 10-वी-भाषा-विषय-तोंडी-परीक्षा-प्रश्नपत्रिका-अंतर्गत-मूल्यमापन, 10th, 10th Hindi Oral Exam Sample Question Paper, 10th Marathi Kumarabharati Oral Examination, 10th Marathi Oral Exam Sample Question Paper, 10th Oral Exam Sample Question Paper, 2022, 9 वी, 9th, Chi, download, Evaluation under Std. 10th Language Subject Oral Examination /Question paper 2022, Exam Sample Question Paper, Internal Evaluation, Iyatta, Marathi, Ninth ssc, Of, Of the subject, Oral Exam, pdf, Question paper, Sample, Sample question paper, ssc, T, Tenth English Oral Exam Sample Question Paper, Tenth Marathi Oral Exam Sample Question Paper, X, अंतर्गत मूल्यमापन, इ., इयत्ता, इयत्ता 10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमापन / प्रश्नपत्रिका 2022, ची, च्या, तोंडी परीक्षा, दहावी, दहावी मराठी कुमारभारती तोंडी परीक्षा, दहावी मराठी तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका, नमुना, नमुना प्रश्नपत्रिका, नववी, प्रश्नपत्रिका, मराठी, विषयाची

दहावी मराठी कुमारभारती तोंडी परीक्षा | अंतर्गत मूल्यमापन | नमुना प्रश्नपत्रिका
10th Marathi Kumarabharati Oral Examination | Internal Evaluation | Sample question paper

अ)श्रवण कौशल्य  ०५ गुण 
आ)भाषण कौशल्य  ०५ गुण 
इ)स्वाध्याय  १० गुण 
एकूण गुण  २० गुण 

💥तोंडी परीक्षेकरिता खालीलपैकी कोणतीही दोन कौशल्ये निवडणे अपेक्षित आहे.💥

अ) श्रवण कौशल्य ( खालीलपैकी कोणतेही एक निवडणे.)
  श्रवण कौशल्याची चाचणी ‘श्रवण लेखन’ स्वरुपात घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध वेळ यानुसार विद्यार्थ्यांचे गट करावेत. खालील चार पर्यायापैकी कोणताही एक पर्याय श्रवण कौशल्यासाठी निवडावा.

१) परिच्छेद ऐकून त्यांवर आधारित विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे, (किमान ०५ प्रश्न) (योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण )
सूचना :
i) निवडलेला परिच्छेद पाठ्यपुस्तकातील असावा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द )
ii) प्रस्तुत परिच्छेदावर किमान ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
iii) प्रश्न फळयावर लिहून द्यावेत.
(iv) प्रस्तुत परिच्छेद किमान दोन वेळा सावकाश, स्पष्टपणे वाचून दाखवावा.
v) फळयावर लिहिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी स्वतंत्र  उत्तरपत्रिकेच्या
पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
vi) प्रत्येक गटासाठी स्वतंत्र परिच्छेद निवडावा.
vii) प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे योग्य उत्तरास गुणदान करावे.
viii) एकूण गुण पाचपैकी दयावेत.
ix) निवडलेले परिच्छेद, त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्याच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.

२) ५ वाक्ये किंवा १० शब्द ऐकून लिहिणे. ( योग्य वाक्यास प्रत्येकी ०१ गुण, योग्य १० शब्द लिहिल्यास प्रत्येकी १/२ गुण)
वाक्यासंदर्भात सूचना –
i) पाठ्यपुस्तकातील कोणतीही ०५ वाक्ये निवडावीत.
ii) चार ते पाच शब्दांचे वाक्य असावे.
iii) २ सोपी, २ मध्यम व १ कठिण याप्रकारे वाक्ये निवडावीत.
iv) प्रत्येक वाक्य किमान दोन वेळा सुस्पष्टपणे वाचून दाखवावे.
v) एकेक वाक्य शिक्षकांनी वाचून विद्यार्थ्यांनी ते ऐकून उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.

किंवा

शब्दांसंदर्भात सूचना –

i) पाठ्यपुस्तकातील १० शब्दांची निवड करावी.
ii) ४ सोपे ४ मध्यम, २ कठीण याप्रकारे शब्दांची निवड करावी.
iii) शिक्षकांनी एकेक शब्द किमान दोन वेळा सुस्पष्टपणे वाचून दाखवावा.
iv) एकेक शब्द शिक्षकांनी वाचून विद्यार्थ्यांनी तो एकून उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
श्रवणकौशल्यासाठी निवडलेली ०५ वाक्ये किंवा १० शब्द गटवार नियोजनानुसार लिखित स्वरुपात असावीत. ऐकून लिहिलेली वाक्ये किंवा शब्द यासंबंधीच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या पुरवण्या व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे
३) कविता ऐकून त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे (किमान ०५ प्रश्न) (योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण)
सूचना :
i) पाठ्यपुस्तकातील कविता निवडणे अपेक्षित.
ii) निवडलेल्या कवितेवर ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करणे..
iii) कवितेवरील प्रश्न फळ्यावर लिहावेत.
iv)प्रस्तुत कविता किमान दोन वेळा सावकाश लयीत, स्पष्टपणे वाचून दाखवावी.
v)फळ्यावर लिहिलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
vi) प्रत्येक गटासाठी स्वतंत्र कविता निवडावी.
vii) प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणे योग्य उत्तरास गुणदान करावे.
viii) एकूण गुण पांचपैकी द्यावेत. निवडलेल्या कविता, त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या
ix) उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.

४) ऑडिओ क्लीप ऐकून त्यांवर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
( किमान ०५ प्रश्न) (योग्य उत्तरास प्रत्येकी ०१ गुण)

सूचना :

i) पाठ्यपुस्तकातील पाठ्यांशावर आधारित ऑडिओ क्लीप ऐकवावी.
ii) ऑडिओ क्लीप स्वतः तयार करावी.
iii) निर्दोष असावी.
iv) प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ऑडिओ क्लीप असावी.
v) ऑडिओ क्लीपवर आधारित ०५ वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करावेत.
vi) हे प्रश्न ऑडिओ क्लीप ऐकवण्यापूर्वी फळयावर लिहावेत.
vii) ऑडिओ क्लीप किमान दोन वेळा विद्यार्थ्यांना ऐकवून विद्यार्थ्यांनी संबंधित पाच प्रश्नांची उत्तरे उत्तरपत्रिकेच्या पुरवणीवर लिहिणे अपेक्षित आहे.
viii) प्रत्येक प्रश्नाला एक गुण याप्रमाणेयोग्य उत्तरास गुणदान करावे.
ix) एकूण गुण पाचपैकी द्यावेत,
x) ऑडिओ क्लीप, त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न, विद्यार्थ्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका व गुणपत्रक शालेय स्तरावर जपून ठेवावे.

 💥नमुना तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा. 💥

 

आ) भाषण कौशल्य (खालीलपैकी कोणतेही एक)

‘भाषण’ हे एक महत्वाचे भाषिक कौशल्य आहे. विदयाथ्यांनी ऐकलेला, वाचलेला अनुभवलेला प्रसंग भाषेद्वारे व्यक्त करणे किंवा स्वतःचे विचार, मत योग्य भाषेत प्रकट करणे, या कौशल्यात अभिप्रेत आहे. विचारांची स्पष्टता, मांडणी, समर्पक शब्दरचना, भाषिक समज, सभाधीटपणा इत्यादी मुद्दे भाषण कौशल्याच्या मूल्यमापनात विचारात घ्यावेत.

१) वाचन केलेल्या कोणत्याही एका पुस्तकाविषयीचे स्वमत प्रकट करणे.

किंवा 
२) दिलेल्या विषयांवर विचार प्रकट करणे. (सदर विषय विदयार्थ्याच्या अनुभवविश्वाशी सुसंगत असावेत.)
किंवा 
३) पाठयपुस्तकातील पाठ किंवा कविता यांवर ८ ते १० वाक्यांमध्ये आपले विचार प्रकट करणे. (विषयानुसार मांडणी, भाषाशैली, सभाधीटपणा, आकर्षक सुरूवात योग्य शेवट या मुद्द्यांचा विचार गुणदानासाठी करणे अपेक्षित)

 इ) स्वाध्याय १० गुण
सूचना –
i) प्रत्येक विदयार्थ्याने संपूर्ण वर्षात दोन स्वाध्याय पूर्ण करणे अपेक्षित आहे..
ii) प्रत्येक स्वाध्यायास ०५ गुण.

iii) दोन पैकी एक स्वाध्याय गदय अथवा पदय घटकावर आधारित असावा. स्वाध्यायात आकलन, स्वमत, अभिव्यक्ती इत्यादी प्रकारांच्या कृती असणे अपेक्षित आहे. व दुसरा स्वाध्याय हा उपयोजित लेखन या घटकावर आधारित असावा.

💥 नमुना स्वाध्याय डाऊनलोड करा. 💥

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleजलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन | इयत्ता दहावी | Assessment of Water Security Subject | Class X
Next articleइयत्ता दहावी | गणित | अंतर्गत मूल्यमापन | नमुना प्रश्नपत्रिका | Std X | Mathematics | Internal Evaluation | Sample question paper
Email: marathistudymaterial@gmail.com

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here