पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) ही दि. २०/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत संदर्भ क्र. २ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहिर करण्यात आले होते. तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थितो व बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थीहित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा दि. २०/०७/२०२२ ऐवजी रविवार दि. ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि.३१/०७/२०२२ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे पत्र पहा 👇👇
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था शालेय मुलांसाठी "यंग सायंटिस्ट प्रोग्राम" "युवा विज्ञानी कार्यक्रम", युविका या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत आहे, तरुण विद्यार्थ्यांना अंतराळ तंत्रज्ञान, अवकाश...