[ मराठी नाटक ] marathi natak
( मुक्त ज्ञानकोशातून )
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात असलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य किंवा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे ‘ब्रेथ’ हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा०. ब्रेथ) बारा तासांपर्यंत (उदा० पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे. नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे.
नाटकाचा इतिहास
भारतीय रंगभूमीचा इतिहास बराच प्राचीन आहे.
भारतात काही रंगभूमीपूर्व कलांचा आढळ होता, असे प्राचीन भारतीय साहित्यांमधील संदर्भांवरून लक्षात येते. गोष्टी सांगण्याच्या कलेतून आख्यानकाव्यांचा जन्म झाला, आणि आख्यानकाव्यांमधून महाकाव्यांची निर्मिती झाली. ही महाकाव्ये मौखिक परंपरेतून पिढ्यानपिढ्या जतन करण्यात आली. महाकाव्यांमधील आख्याने लोकसमुदायासमोर सादर करण्यात येत असत. त्यात वाचिक अभिनयासह संगीताचाही समावेश असे. त्याचप्रमाणे. प्राचीन भारतामधील आर्य संस्कृतीमध्ये यज्ञयाग केंद्रस्थानी होते. त्यांच्या अनुष्ठानामध्ये अनेक गोष्टी अभिनय केल्यासारख्या करावयाच्या असत. वेदवाङ्मयामध्ये काही संवादसुक्ते आढळतात. या सुक्तांचे पठन करताना वाचिक अभिनय आणि हावभावांची जोड मिळून छोटे नाट्यप्रसंग सादर होत असावेत.
इ.स.पू. दोनशे ते इ.स.दोनशे या चारशे वर्षांच्या दरम्यान केव्हातरी संस्कृत नाट्यलेखनापासून ते नाट्यप्रयोगाची इत्यंभूत माहिती देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ रचला गेला. भरत हा नाट्यशास्त्राचा कर्ता समजला जातो.
संस्कृत नाटकांमध्ये सर्वांत प्राचीन अशी नाटके अश्वघोष या नाटककाराची मानता येतील. त्याची नाटके बौद्ध धर्मातील शिकवणी संदर्भातील होती. परंतु ती त्रुटित स्वरूपात मिळालेली असल्याने कथानकाची पूर्ण कल्पना करता येत नाही. सन १९१२मध्ये केरळात ताडपत्रांवर लिहिलेली भास या नाटककाराची तेरा नाटके सापडली. त्याने रचलेले स्वप्नवासवदत्ता हे संस्कृत भाषेतील एक महत्त्वाचे नाटक मानले जाते. कर्णभार आणि ऊरुभंग या एकांकी नाटकांमध्ये महाभारतातील खलपात्रांचे उदात्तीकरण असून ती नाटके करुणरसप्रधान आहेत. गुप्तकाळातील कालिदास या नाटककाराची मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके प्रसिद्ध आहेत. ती शृंगाररसप्रधान आहेत. शूद्रकाने रचलेले मृच्छकटिक हे एक लोकप्रिय संस्कृत नाटक होते. यात चारुदत्त आणि वसंतसंनेच्या प्रणयकथेला समांतर अशी राज्यक्रांतीची कथा आहे. इतर संस्कृत नाटककारांमध्ये भवभूती (नाटक – उत्तररामचरित), विशाखादत्त (नाटक – मुद्राराक्षस), इत्यादींचा समावेश होतो.
**************
• बटाट्याची चाळ
• शांतता ! कोर्ट चालु आहे
• नटसम्राट
• ती फुलराणी
• तो मी नव्हेच
• पती सगळे उचापती
• मोरुची मावशी
• एका लग्नाची गोष्ट
• हसवा फसवी
https://youtu.be/v4-MqXYJq6o
• गेला माधव कुणीकडे
• तुझे आहे तुजपाशी
• असा मी असामी
• शांतेच कार्ट चालु आहे
• श्री तशी सौ
• वासु ची सासू
• अखेरचा सवाल
• शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही
Part 1 –
https://youtu.be/07R2IFyyJ9E
Part 2 –
• चल कहितरीच काय
• चार दिवस प्रेमाचे
• कुर्यात सदा टिंगलम
• तुझ्या माझ्यात
• खर सांगायच तर
• सखाराम बाईंडर
• कुसूम मनोहर लेले
• अशी पाखरे येती
• सेलीब्रेशन
• अप्पा आणी बाप्पा
• कार्टि काळजात घुसली
• बॅरिसटर
• मित्र
• अश्रूंची झाली फुले
• डाॅक्टर तुम्हीसुद्धा
• डबल गेम
• सूर राहु दे
• गोड गुलाबी
• अधांतर
https://youtu.be/ECwRnB8n2z4
• सुंदर मी होणार
• नातीगोती