Home १० वी बालभारती बोलतो मराठी पाठावरील स्वाध्याय व पाठाचे स्पष्ठीकरण

बोलतो मराठी पाठावरील स्वाध्याय व पाठाचे स्पष्ठीकरण

0
bolto marathi
.

मार्गदर्शक : प्राचार्य गणेश देशपांडे,
सोलापूर.


.

बोलतो मराठी स्वाध्याय 

प्रश्न १ला : आकृत्या पूर्ण करा.

(खालील उत्तरे  आकृती न देता दिले आहे विद्यार्थ्यांनी वहीत उत्तर लिहताना आकृत्या  काढाव्यात )

(अ) भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय

➤ योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे.

➤ क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे.

(आ) मराठी भाषेची श्रीमंती

 ➤ मराठी ढंगाचे शब्दप्रयोग

➤ मराठी वाक्प्रचार

.

प्रश्न २ रा : शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा.

➤ भाषेतली गंमत जाणून घेता येते.

➤ खूप नवीन माहिती मिळते.

➤ शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, हे कळते.

➤ आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत.

➤ शब्द मनात पक्का रूजतो.

.

प्रश्न ३ रा : पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

(अ) मराठी भाषेची खास शैली  :- वाक्प्रचार

(आ) मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा :- हवा

(इ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन : – शब्दकोश

.

प्रश्न ४ रा : गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

(अ) ऐट, डौल, रुबाब, चैन

  उत्तर :- चैन

(आ) कपाळ, हस्त, ललाट, भाल

उत्तर :- हस्त

(इ) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय

उत्तर :- विनोद

(ई) संपत्ती, संपदा, कांता, दौलत

उत्तर :- कांता

(उ) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध

उत्तर :- प्रज्ञा

.

प्रश्न ५ वा : खाली दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा.

(अ) रस्ते — एकवचनी रूप – रस्ता.

हा रस्ता खूपच अरूंद आहे.

(आ) वेळा — एकवचनी रूप – वेळ.

बस येण्याची वेळ झाली.

(इ) भिंती — एकवचनी रूप – भिंत.

ही भिंत रंगित आहे.

(ई) विहिरी — एकवचनी रूप – विहीर

➤ही विहीर खूप खोल आहे.

(उ) घड्याळे  — एकवचनी रूप – घड्याळ

मी आज घड्याळ घातले नाही.

(ऊ) माणसे  — एकवचनी रूप – माणूस

मे महिन्याच्या उन्हात एकही माणूस घराबाहेर पडत नाही.

.

प्रश्न ६ वा : खालील शब्दसमुहाबद्दल एक शब्द लिहा.

(अ) पसरवलेली खोटी बातमी उत्तर :- अफवा

(आ) ज्याला मरण नाही असा उत्तर :-अमर

(इ) समाजाची सेवा करणारा उत्तर :- समाजसेवक

(ई) संपादन करणारा :- संपादक

.

प्रश्न ७ वा : (स्वमत / अभिव्यक्ती)

 (१) भाषा सतत बदलत असते, याची कारणमीमांसा द्या.
उत्तर : एखाद्या परिसरात, एकमेकांमध्ये सहज मिसळता येईल अशा अंतरात राहणाऱ्या लोकांचा एक समाज बनतो. त्यांची भाषा एकच असते. तिच्यातले शब्द, वाक्य घडवण्याचे नियम हे ती भाषा बोलणाऱ्या सगळ्यांना ठाऊक असतात. आपले बोलणे एकमेकांना समजण्यासाठी ही समानता असणे आवश्यकच असते. एकमेकांचे बोलणे समजण्यासाठी ती भाषा काही काळ तरी स्थिर राहावी लागते. तशी ती स्थिर असतेसुद्धा. मात्र, प्रत्येक पिढीमध्ये त्या त्या ठिकाणाच्या भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असतात. जसजसा लोकांचा विकास होतो, तसतशी त्यांची भाषासुद्धा विकसित होत जाते.

आधुनिक काळात अनेक समाज एकमेकांच्या जवळ नांदतात. एकमेकांत मिसळतात. या वेगवेगळ्या समाजांचा प्रभाव एकमेकांच्या भाषेवर पडतो. प्रत्येक भाषा अशी बदलत राहते. म्हणून कोणतीही भाषा कधीही स्थिर नसते. तीत सातत्याने बदल होत राहतो. काळ बदलतो, तशी लोकांची जगण्याची रीत बदलते. त्यामुळे भाषेतले शब्द बदलतात. जुने शब्द लोप पावतात. नवीन शब्दांची भर पडते. अन्य भाषांमधील शब्द-संकल्पना स्थानिक भाषेत सामावले जातात. स्थानिक भाषेतील शब्द-संकल्पना अन्य भाषांमध्ये शिरतात. अशा प्रकारे प्रत्येक भाषा प्रत्येक क्षणी बदलत असते.

(२) ‘स्वत:च्या भाषेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे स्वतःच्या भाषेचा सन्मान करणे होय’, हे विधान समजावून सांगा.
उत्तर : माणसाला एकमेकांशी संवाद साधण्याचा महत्त्वाचा धागा म्हणजे भाषा होय. माणूस दुसऱ्याशी बोलतो म्हणजे तो दुसऱ्याजवळ आपले मन प्रकट करीत असतो. प्रत्येक भाषा म्हणजे ती बोलणाऱ्याच्या मनाचा आरसा असते. म्हणूनच कोणतीही भाषा म्हणजे ती बोलणाऱ्यांचे जीवन, त्यांची संस्कृती होय. एखादया भाषेचा सन्मान करणे म्हणजे ती भाषा बोलणाऱ्यांचा सन्मान करणे असते. स्वत:च्या भाषेचा सन्मान आपण कसा करणार? सर्वांत प्रथम म्हणजे मी माझी स्वत:ची भाषा उत्तम रितीने आत्मसात करीन माझे सर्व विचार, भावना माझ्या भाषेत कसोशीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करीन. माझी भाषा उत्तम येण्यासाठी मी माझ्या भाषेतील वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचे नियमित वाचन करीन. माझ्या भाषेतील उत्तमोत्तम साहित्याचा आस्वाद घेत राहीन. भाषा चांगल्या रितीने आत्मसात करण्यासाठी शब्दकोश, व्युत्पत्ती कोश यांसारख्या कोशांचा वेळोवेळी मनापासून उपयोग करीन.

यामुळे माझे माझ्या भाषेवरील प्रभुत्व वाढेल. अशा प्रकारे स्वत:च्या भाषेवरील प्रभुत्व वाढवणे म्हणजे त्या भाषेचा सन्मान करणे होय.

.

बोलतो मराठी पाठ समजून घेण्यासाठी  येथे क्लिक करा.👇👇
  Link Click GIF by Buzzstock
बोलतो मराठी पाठावर आधारित online Test सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇
  Link Click GIF by Buzzstock
.

Sustainable Chemistry | Sustainable Chemistry conferences 2019 | Environmental conferences | UK | Worldwide Events | Europe | Asia | Middle East | 2019 | 2020

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

 

Previous articleआजी : कुटुंबाचं आगळ | पाठाचे स्पष्टीकरण- स्वाध्याय
Next articleशालेय वार्षिक नियोजन २०२२-२३ | School Annual Planning 2022-23
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here