Home इयत्ता दहावी मराठी कुमारभारती | वाक्प्रचार व त्यांचे अर्थ |Class X Marathi Kumarabharati | Phrases and their meanings

इयत्ता दहावी मराठी कुमारभारती | वाक्प्रचार व त्यांचे अर्थ |Class X Marathi Kumarabharati | Phrases and their meanings

💥💥💥💥वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 💥💥💥💥 
  विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी मराठी कुमारभारती या विषयाच्या कृतीपत्रिकेत  भाषाभ्यास या विभागात व्याकरण घटकावर आधारित कृती मध्ये वाक्प्रचार हे ०४ गुणांसाठी विचारले जाते. वाक्प्रचारांचा जर आपल्याला अर्थ माहीत असेल तर सहज त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करता येतो. म्हणून खालील प्रमाणे इयत्ता दहावी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील पाठानुसार वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिले आहे. त्यांचा स्वतःच्या भाषेत वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न करा..
💥पाठानुसार वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिले आहे. त्यांचा स्वतःच्या भाषेत वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न करा. 💥
  • पाकीट मारणे : पैशाचे पाकीट शिताफीने चोरणे.
  •  ताव मारणे : भरपूर खाणे.
  • माश्या मारणे : रिकामटेकडेपणाने वेळ घालवणे.
  • खस्ता खाणे : खूप कष्ट करणे.
  • कंठस्नान घालणे : ठार मारणे.
  • खांद्याला खांदा लावणे  : सहकार्य करणे.
  • खांदा देणे : प्रेत वाहून नेण्यात सहभागी होणे.
  • अकलेचा कांदा असणे :  अतिशहाणा असणे.
  • एखाद्याला हसणे  :  एखादयाची थट्टा करण्याच्या हेतूने हसणे.

  • हुकूमत गाजवणे : अधिकार गाजवणे.
  • हातात काठी येणे : म्हातारपण येणे; तोल सांभाळता न येणे.
  •  गुण्यागोविंदाने नांदणे : समंजसपणे व आनंदाने राहणे.
  • धार काढणे : गायी-म्हशीचे दूध काढणे..
  • कटाक्ष असणे : खास लक्ष देणे.
  • धान्य निवडणे : धान्यातले खडे / कचरा इत्यादी वेचून बाहेर काढणे.
  • हुक्की येणे : लहर येणे.

  • कटाक्षाने टाळणे : आवर्जून टाळणे, लक्षात ठेवून टाळणे.
  • कुचेष्टा करणे : हिणवणे.
  • डोळ्यांत भरणे : पसंतीस उतरणे, खूप आवडणे.
  • तुच्छ लेखणे : कमी लेखणे.
  •  दृष्ट लागणे : नजर लागणे.
  • नजरेत भरणे : खूप आवडणे.
  • नवल वाटणे : आश्चर्य वाटणे.
  • निरखून पाहणे : लक्षपूर्वक पाहणे.
  • मुग्ध होणे : गुंग होणे.
  • शिरोधार्य मानणे : आदराने मान्य करणे.

  • पाढा वाचणे : एकाच वेळी एकामागोमाग एक अशा अनेक गोष्टी (चुका, तक्रारी, अपराध, गुन्हे) जोरदारपणे मांडणे.
  • मनाच्या खिडक्या उघडणे : नवीन दृष्टी मिळणे.
  • हृदयाला साद घालणे : भावनेला आवाहन करणे, भावना जाग्या करणे.

पाठानुसार वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिले आहे. त्यांचा स्वतःच्या भाषेत वाक्यात उपयोग करण्याचा प्रयत्न करा

  • जीव नसणे : प्राण नसणे, अचेतन असणे.
  • मान देणे : आदर करणे, सन्मान देणे.
  • हमी देणे : शाश्वती / आश्वासन देणे.
  • लाडावून ठेवणे : सतत कौतुक करणे.
  • आयुष्य संपणे : मरण येणे.
  • निरोप देणे : सोडणे.
  • शाबूत ठेवणे : जपून शिल्लक ठेवणे.

Vakprachar with Meaning in Marathi Std 10


  • गिरक्या खाणे : स्वतःभोवती गोल गोल फिरणे.
  • मातीत लोळणे : क्षुद्र पातळीवर जगत राहणे.
  • जीव खाणे : खूप त्रास देणे.
  • कपाळाला आठी घालणे : वैतागणे
  • (एखाद्या गोष्टीचा) चेंदामेंदा करणे : (एखादया गोष्टीचा) चिरडून चिरडून चक्काचूर करणे.
  • मातीत मिसळणे : जीवनाचा अंत होणे.
  • तोंडसुख घेणे : टीका करून, टोचून बोलून आनंद घेणे.
  • कित्ता गिरवणे : आधीच्या प्रमाणेच पुन्हा वागणे / अनुकरण करणे.
  • अंतर कायम असणे : पूर्वीसारखाच फरक राहणे.

  •  तोंडावर येणे : जवळ येऊन ठेपणे.
  • सार्थक होणे : धन्यता वाटणे, परिपूर्ती होणे.
  • मन आतून फुलून येणे : मन आनंदाने भरून येणे.
  • थक्क होणे : आश्चर्यचकित होणे.
  • भान विसरणे : बेभान होणे, शुद्ध हरपणे.

  • एखादी गोष्ट कानावर पडणे : लोकांच्या बोलण्यातून एखादी गोष्ट कळणे.
  • लोकांनी नाव घेणे : लोकांनी स्तुती करणे.
  • डोळ्यांतले पाणी पुसणे :  दुःख दूर करणे.
  • चित्र बदलून जाणे : स्वरूप बदलणे.

  • नाते जडणे : अतूट भावबंध निर्माण होणे.
  •  जीव लावणे :  मायेचे बंध निर्माण होणे.

  • शिरोधार्य मानणे : आदरपूर्वक स्वीकार करणे.
  • विचारचक्र सुरू होणे : विचार सुरू होणे.
  • प्रसाद देणे  : आशीर्वाद म्हणून एखादी गोष्ट देणे; (येथे अर्थ) भरपूर बदडून काढणे.
  • ढालीप्रमाणे रक्षण करणे : सर्व संकटे स्वतः झेलून दुसऱ्याचे रक्षण करणे.
  • गगनभरारी घेणे : खूप प्रगती करणे.
  • डोक्यावर परिणाम होणे : वेड लागणे.
  • हसण्यावारी नेणे : काहीही महत्त्व न देणे.
  • दाखवून देणे : सिद्ध करणे.
  • तावून सुलाखून निघणे : आत्यंतिक कठीण परीक्षेत यशस्वी होणे,
  • तोंड देणे : सामोरे जाणे.
  • पित्त खवळणे :  खूप संतापणे.
  • धडा देणे : शिकवण देणे.

  • खूणगाठ बांधणे : पक्के ध्यानात ठेवणे.
  • डोक्यावर घेणे : गौरव करणे.
  • डोळे टिचणे : डोळे भरून येणे.
  • तमा न बाळगणे : पर्वा न करणे.
  • मुहूर्तमेढ रोवणे : स्थापना करणे, आरंभ करणे.
  • विद्रोह करणे : प्रखर विरोध करणे.
  • ससेहोलपट होणे : खूप त्रास होणे,अतिशय छळ होणे.

  • घड्याळाचे काटे मागे फिरवणे : भूतकाळात जाणे.
  • सुस्कारे सोडणे : उसासा टाकणे.
  • खनपटीला बसणे : एखाद्याच्या मागे सतत लागणे.
  • तगादा लावणे : पुन्हा पुन्हा सतत आग्रह धरीत राहणे.
  • पिच्छा पुरवणे : एकसारखे मागे लागणे.
  • निकाल लावणे : सोक्षमोक्ष लावणे, मार्गी लावणे.
  • गुडघे टेकणे : शरणागती पत्करणे.

  • धीर न सुटणे : हिंमत न हारणे.
  • उमेदीने जगणे : जिद्दीने जीवन जगणे.
  • मूठ भरलेली असणे : जीवनात वैभव, सुखसंपन्नता असणे.

  • तळहातावर शीर घेणे : जीवाची पर्वा न करता शत्रूशी लढणे.
  • खचून जाणे : मानसिकदृष्ट्या कोलमडणे.
  • झुगारून देणे : पर्वा न करणे.
  • वीरगती प्राप्त होणे : देशासाठी लढता लढता मरण येणे.
  • निकराने लढा देणे : अखेरपर्यंत शर्थीने, चिवटपणे झुंज देत राहणे.

  • आकाशी झेप घेणे : मन ध्येयाकडे उंच झेपावणे.
  • विहार करणे :  संचार करणे.
  • फळ मिळणे : कार्य यशस्वी होणे.
  • जीव बावरा होणे : गोंधळून जाणे, गडबडून जाणे.
  • घामातून मोती फुलणे : कष्टातून फळ (यश) मिळणे.
  • जीवनात योग येणे : आयुष्यात सुखकारी घटना घडणे.

  •  खोडी काढणे : त्रास देणे.
  • गट्टी जमणे : पक्की मैत्री होणे.
  • डोळे विस्फारून बघणे : आश्चर्याने डोळे मोठे करून बघणे.
  • ताईगिरी करणे : वयाने लहान असणाऱ्या व्यक्तीवर हुकुमत गाजविणे.

  • निकालात काढणे : निर्णय करून टाकणे.
  • आनंद गगनात न मावणे : खूप आनंद होणे.
  • नाचक्की होणे : बदनामी होणे.
  • दैव बलवत्तर असणे : केवळ दैवामुळेच वाचणे.
  • प्रसंगाला तोंड देणे : प्रसंगात धीराने वागणे.
  • द्विधा मन:स्थितीत असणे : गोंधळलेल्या मन:स्थितीत असणे.
  • अचंबित होणे : आश्चर्यचकित होणे.

Vakprachar with Meaning in Marathi Std 10


  • पाठ फिरवणे : मदत न करणे, वंचित ठेवणे.
  • स्वागत करणे : मानाने, आदराने एखाद्या व्यक्तीला या म्हणणे.
  • परिस्थितीवर स्वार होणे : परिस्थितीवर मात करणे.
  • बहिष्कृत करणे : बाहेर ठेवणे, वंचित करणे.
  • रणशिंग फुंकणे : युद्ध सुरू होण्याचा इशारा देणे.
  • बेड्या तोडणे : स्वतंत्र होणे.
  • गळून पडणे : निखळून पडणे.
  • ध्यास घेणे: एखाद्या गोष्टीची ओढ वाटणे.
  • प्रतीक्षा करणे : वाट पाहणे.

  • साकडे घालणे : विनवणी करणे.
  • आपलेसे करणे : आपुलकी निर्माण करणे.
  • समरस होणे : एकरूप होणे.
  • गुण्यागोविंदाने राहणे : मिळून मिसळून आनंदाने राहणे.
  • कास धरणे : सोबत धरणे.

  •  इनाम मिळणे : बक्षीस मिळणे.
  • सुलभीकरण करणे : सोपे करून सांगणे..
  • निरीक्षण करणे : नीट पाहणे.
  • मंजूर करणे : सहमत होणे.
  • ताकास तूर लागू न देणे : थांग लागू ण देणे, गुपित पाळणे.
  • ध्यानात घेणे : लक्षात घेणे.

Vakprachar with Meaning in Marathi Std 10

💥पाठानुसार वाक्प्रचार व त्यांचे अर्थ  पाहण्यासाठी येथे क्लिक करा 💥


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️